निवृत्ती सुधाकर  दाभाडे
निवृत्ती सुधाकर दाभाडेVerified
2h agoChhatrapati Sambhajinagar, Maharashtra

ज्ञानविकासच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली हस्तकला सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर भराडी प्रतिनिधी, गणपती बाप्पाच्या मुर्त्या कशा प्रकारे बनवल्या जातात याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी वांगी बु. येथील पवार आर्ट्स लघुउद्योगात जात , प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार होणाऱ्या मुर्त्या अनुभवल्या.यावेळी माहिती मिळाली की,राजस्थानातून माती , साच्या स्वतःकुंभार येथेच तयार करतात, रंग मुंबई येथून आणून दिल्या जातो,शिवाय विक्री प्रक्रिया समजून घेत याठिकाणच्या मुर्त्या 15 जिल्ह्यात जात असल्याची माहिती मिळते. तयार केली गेलेली मूर्ती 7 इंच ते दहा फूट उंची पर्यंतची मूर्ती येथे बघायला मिळाली. डिझेल वाढीमुळे दरवर्षीच्या तुलनेने सरासरी 30 टक्के दर वाढ झाली असली तरी या ठिकाणी सहा हजार मुर्त्या तयार झाल्याचे सांगण्यात आले.याविषयी माहिती जाणून घेत व्यवहारिक माहिती प्रात्यक्षिक अनुभवले.यावेळी आर्ट्स गॅलरीचे कमल पवार,योगेश पवार, मंगेश पवार , ज्ञानविकास विद्यालय भराडीच्या श्रीमती अनिता टाकळकर, श्रीमती संगीता पाटील आदींनी मार्गदर्शन केले.

0 comments

No comments yet