निवृत्ती सुधाकर  दाभाडे
निवृत्ती सुधाकर दाभाडेVerified
3d agoChhatrapati Sambhajinagar, Maharashtra

इगतपुरी तालुक्यातील 🌊 भावली धरण परिसरात कचऱ्याचे साम्राज्य; प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी! 🚨 भावली धरण परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत; मात्र अनेक पर्यटक कचरा करून तिथेच टाकून जात आहेत. इतकेच नाही तर दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या व इतर प्लास्टिकचा कचरा थेट धरणाच्या पाण्यात जात आहे. ♻️💧 यामुळे धरणातील पाण्याचे प्रदूषण होण्याबरोबरच जलचर, पर्यावरण आणि परिसरातील निसर्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन धरण परिसरात नियमित स्वच्छता, कचरा पेट्यांची व्यवस्था, जनजागृती फलक तसेच कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. भावली धरण केवळ पर्यटनस्थळ नाही, तर आपल्या पर्यावरणाची आणि जलसंपत्तीची अमूल्य ठेव आहे. ती जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. 🌳💧 🙏 धरण स्वच्छ ठेवा… पाणी वाचवा… निसर्ग वाचवा! — बंटी पगारे 🌳 वृक्षप्रेमी | 💧 दारणा नदी सेवक तालुका अध्यक्ष – निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य

9 comments

No comments yet