L
Lokkesh Mundafale
10d agoNagpur, Maharashtra

*पर्यावरण संरक्षण गतिविधि - युवाशक्ती कार्यविभाग, विदर्भ प्रांत* च्या संकल्पनेतून *ऐरावत ढोल ताशा ध्वज पथक* आणि *टीम युवा फॉर नेचर* यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अथक प्रयत्नातून एक आगळा वेगळा ‘ *प्रकृतिवंदना* ' चा भव्य दिव्य कार्यक्रम चिंताहरण गणेश मंदिर, जरीपटका, नागपूर येते पार पडला. *मानाचे पहिले वादन - प्रकृती वंदन* हे ब्रीद घेऊन ऐरावत ढोल ताशा ध्वज पथकाने आपले *पहिले मानाचे वादन करून प्रकृतीला आणि पर्यावरणाला मानवंदना अर्पण* करून वादनाचा श्रीगणेशा केला. केवळ नागपूर आणि विदर्भातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रात असा उपक्रम प्रथमच पार पडला आहे. या वादनातून *पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देऊन पर्यावरण पूरक जीवनशैली आणि शास्त्रोतक पद्धतीने गणेशोत्सव तसेच इतर सण कशा प्रकारे साजरे केले जाऊ शकतात याचे मूर्तिमंत उदाहरण* घालून दिले गेले. *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर सहकार्यवाह श्री. दिनेशजी गौर* आणि सदर भाग कार्यवाह श्री. गणेश दास यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेश पूजन व भारत माता पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या निनादासह, भगव्या ध्वजस्तंभांनी आणि हिंदू धर्माच्या जयघोषांनी परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण संचारले होते. वादनासोबत *वृक्षसंवर्धन, वृक्षतोड रोखणे आणि निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेश* नागरिकांना देण्यात आला. *प्लास्टिकचा वापर टाळा, स्वच्छता राखा आणि पर्यावरणाचे संरक्षण करा* , असे जनजागृतीपर *संदेश फलक* घेऊन पथकातील वादकांनी वादन केले. तसेच वादनाच्या माध्यमातून *संस्कृतीसोबतच पर्यावरण संवर्धनाची सामाजिक जबाबदारी* जपण्याचा संकल्प सुद्धा केला. या उपक्रमाने *परंपरा, राष्ट्रभावना आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम* घडवत ऐरावत ढोल ताशा ध्वज पथकाच्या वादनाची प्रेरणादायी सुरुवात झाली असून, पथकातील वय वर्षे दहा ते पंचवीस या वयोगटातील वादकांच्या पालकांची उपस्थिती सुद्धा त्यांच्यासाठी ऊर्जास्रोत म्हणून कार्यरत ठरली.

9 comments

No comments yet