
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य ,एस आर दळवी फाउंडेशन आणि विविध संस्थाच्या संयुक्त विद्यमाने पिराचा डोंगर येथे महावृक्षारोपण संपन्न सातारा जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व कराड तालुका एस आर दळवी फाउंडेशन च्या माध्यमातून निसर्ग मंडळाचे प्रस्तावीत निसर्गप्रेमी सुहास पाटील सर यांच्या अथक प्रयत्नातून आणि जिल्ह्याचे राज्यसंघटक जगन्नाथ माळी सर यांच्या मार्गदर्शनातून पिराच्या डोंगरावर महावृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्यचे राज्यसंघटक व दळवी फाउंडेशन चे राज्य कार्यकारणी सदस्य व ज्येष्ठ शिक्षक सल्लागार मोहन पाटील सर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये , ज्ञान प्रबोधिनी जागृती हायस्कूल , जिल्हा परिषद शाळा जिंती व महसूल विभाग यांच्यासोबतच एस आर दळवी फाउंडेशनच्या प्रत्यक्ष उपस्थीतीतुन वड, पिंपळ ,जांभूळ ,/ करंज अशा अनेक महावृद्धी रोपांच्या वृक्षांचे पिराचा डोंगर येथे वृक्षारोपण करण्यात आले .* *प्रसंगी जिंती गावचे ग्रामस्थ , शाळेचे विद्यार्थी- पालक, शिक्षक, महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत महावृक्षारोपणाचा सोहळा संपन्न झाला .सर्व उपस्थितांचे निसर्गप्रेमी व कराड तालुका दळवी फाऊंडेशनचे सुहास पाटील सर यांनी आभार मानले*

