S
Sanjay Garde
2y ago

ध्यास फाउंडेशन,वसईचे काशीनाथ घेलाभाई हायस्कूल येथे घनकचरा व्यवस्थापन बाबत प्रबोधन.

आज दि.१८ जुलै २०२४ रोजी वसई,जनपद पालघर येथील प्रमुख स्वयंसेवी संस्था *ध्यास फाउंडेशन* च्या वतीने काशीदास घेलाभाई हायस्कूल,आगाशी येथे घनकचरा व्यवस्थापन या विषयीचे प्रबोधन करण्यात आले. हे प्रबोधन संस्थेच्या अध्यक्षा सौ.किर्ती संतोष शेंडे यांनी केले. प्लास्टिक-पॉलिथीन-डिस्पोजेबल्सचे दुष्परिणाम व पर्याय या बाबत विद्यार्थीवर्गाला मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविताताई वाळींजकर या अध्यक्ष स्थानी होत्या. संस्थेच्या पर्यवेक्षिका श्रीमती झरीना अंसारी यांनी प्रास्ताविक केले तर श्री हितेश पिंपळे सरांनी आभार मानले.या कार्यक्रमात NSPC - 2024 बाबत मुलांशी संवाद साधून माहिती देण्यात आली व सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. शाळेचे शिक्षक व ध्यास फाउंडेशनचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

1 comments

No comments yet