S
Sneha Shirodkar
2y ago
जुन्या देवी देवतांच्या मुर्त्यांचे संकलन
कोल्हापूर अर्थ वॉरियर्स तर्फे दर महिना च्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या "जुन्या देवी देवतांच्या मुर्त्यांचे संकलन "उपक्रमाचा एक भाग म्हणून ,आज 30 जून रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये 50 ते 60 लोकांनी देवी देवतांचे फोटो मुर्त्या आणून दिल्या .त्याचे पुढे विधीवर पूजन करून पर्यावरण पूरक निर्गस केले जाते .या उपक्रमामध्ये कोल्हापूर अर्थ वॉरिअसचे अभिजीत कुलकर्णी ,आशिष कोंगळेकर ,तृप्ती देशपांडे, विलास पंधारे आदी स्वयंसेवक लोकांना सेवा द्यायला उपस्थित होते. ज्या नागरिकांनी कोल्हापूर अर्थ वॉरियर्स मार्फत केलेल्या ह्या आव्हानाला साथ दिली व मुर्त्या व फोटो आणून दिले, त्या सर्व नागरिकांचे देखील मनःपूर्वक आभार.
1 comments
